आमच्या सल्लागारांचा बोर्ड

Kishori J Udeshi

किशोरी जे. उदेशी

श्रीमती किशोरी जे उदेशी या पहिल्या महिला होत्या ज्या रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त झाल्या आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डावर नामांकित होणाऱ्या RBI च्या पहिल्या कार्यकारी संचालक होण्याचा मान देखील त्यांना मिळाला आहे. डेप्युटी गव्हर्नर म्हणून, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बँकिंग आणि बिगर बँकिंग क्षेत्राचे नियमन आणि पर्यवेक्षण सामील होते. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स, स्वित्झर्लंडने स्थापित केलेल्या बँकिंग पर्यवेक्षणा बाबत बेसल कमिटीच्या कोअर प्रिन्सिपल्स लायझन ग्रुप आणि कॅपिटलवरील कोअर प्रिन्सिपल्स वर्किंग ग्रुप मध्ये त्यांनी RBI चे प्रतिनिधित्व केले होते.

डेप्युटी गव्हर्नर म्हणून, त्या सेबी, नाबार्ड आणि एक्झिम बँकेच्या बोर्डा मध्ये होत्या आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (प्रा.) लि, बंगळुरूच्या अध्यक्ष म्हणूनही काम करत होत्या. त्यांनी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष म्हणूनही काम केले. २००६ मध्ये, त्यांची RBI द्वारे द बॅंकिंग कोड्स अँड स्टॅंडर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया च्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी या कार्यालयाचे पदभार सोडले. भारत सरकारने (GOI) त्यांची न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक क्षेत्र विधी सुधारणा आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्र सरकार नी पण त्यांची भारतीय रेडक्रॉस सोसायटी, मुंबईच्या बोर्ड साठी नामांकन केले आहे. त्या काही कंपन्यांच्या बोर्ड मध्ये स्वतंत्र गैर-कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात एमए पण केले आहे.

Berjis Desai

बेरजीस देसाई

जे. सागर असोसिएट्सचे अगोदरचे वरिष्ठ भागीदार असलेले श्री. देसाई आता खाजगी वकील आहेत. ते कॉर्पोरेट आणि व्यापारी कायद्यात तज्ञ आहेत आणि १९८० पासून या क्षेत्रात सराव करत आहेत. १९९७ ते २००३ पर्यंत ते उडवाडिया, उदेशी आणि बेरजीसचे व्यवस्थापकीय भागीदार होते. श्री देसाई सध्या भारतीय मध्यस्तता परिषद आणि लंदन कोर्ट ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेटर्सच्या पॅनेल मध्ये आहेत. त्यांनी एका अग्रगण्य भारतीय दैनिकात पत्रकार म्हणूनही काम केले आहे आणि अमेरिकन मध्यस्तता संघटनेचे सहयोगी सदस्य आहेत, ICC-इंडिया आणि बॉम्बे -इन्कॉर्पोरेटेड लॉ सोसायटीचे सदस्य आहेत. ते सध्या अनेक कॉर्पोरेट्समध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडंट बोर्ड सदस्य म्हणून बोर्ड पदावर कार्यरत आहेत.

P H Ravikumar

पी एच रविकुमार

वित्तीय सेवा क्षेत्रात चार दशकां पेक्षा अधिक चा अनुभव असलेले एक व्यावसायिक बँकर, श्री रविकुमार हे वास्तु हाउसिंग फायनान्समध्ये गैर-कार्यकारी संचालक आहेत. हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडची स्थापना आणि उभारणी करणाऱ्या कोर टीमचे प्रतिभागी होते. त्यांनी त्यांच्या टीमसोबत नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज लि. ची संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून संकल्पना मांडली आणि कार्यही केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स आणि चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स लंदनचे सहयोगी म्हणून व्यावसायिक पात्रता असून वाणिज्य चे स्नातक आहे, हे सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट, लंदनचे फेलो देखील आहेत.

बॉबी पारीख

बॉबी पारीख हे ‘बॉबी पारिख असोसिएट्स’ चे संस्थापक आहेत, जी एक बुटीक फर्म असून  धोरणात्मक कर आणि नियामक सल्लागार सेवा प्रदान करते. व्यवहार आणि इतर प्रकारच्या व्यवसाय पुनर्रचनांच्या संबंधात, मग ते इनबाउंड, आउटबाउंड किंवा पूर्णपणे घरगुती असो, कर आणि नियामक सल्ला प्रदान करणे हे त्यांचे मुख्य क्षेत्र आहे. बॉबी प्रायव्हेट इक्विटी फंड, इतर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि व्यवसायांचे मालक आणि व्यवस्थापक यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर काम करतात. नवीन नियम आणि धोरणे तयार करण्यात मदत करण्यासाठी ते नियामक आणि धोरण सूत्रकारांशी देखील जुडलेले आहेत. बॉबी हे बीएमआर एडव्हायझर्सचे सह-संस्थापक होते, जी एक अत्यंत प्रतिष्ठित कर आणि घडामोड फर्म आहे, जिला त्याने स्थापन करण्यात आणि 12 वर्षांहून अधिक काळासाठी चालविण्यास मदत केली. पूर्वी, भारतातील अर्न्स्ट अँड यंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आर्थर अँडरसनचे देशातील व्यवस्थापकीय भागीदार असलेले बॉबी अनेक व्यापार आणि व्यावसायिक संघटनांचे सदस्य तसेच गैर-सरकारी, गैर-नफा संस्था आणि खाजगी तसेच सूचीबद्ध भारतीय कंपन्यांचे सल्लागार आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य देखील आहे. ते मुंबई विद्यापीठातून वाणिज्य चे स्नातक आहेत आणि योग्य चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत.

केनेथ अँड्रेड

ओल्ड ब्रिज कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी, केनेथ यांना भारतीय भांडवली बाजारात २६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे; पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूक संशोधन हे त्यांचे मुख्य क्षेत्र आहे. याआधी, ते IDFC मालमत्ता व्यवस्थापनात मुख्य गुंतवणूक अधिकारी होते, जिथे त्यांनी US$ ९ बिलियन च्यानिधीची देखरेख केली होती. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, IDFC मालमत्ता व्यवस्थापनाला भारतातील सर्वात वेगाने वाढणारे म्युच्युअल फंड हाऊस म्हणून स्थान मिळाले. IDFC मालमत्ता व्यवस्थापनात काम करण्यापूर्वी, ते कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर होते आणि दोन्ही संस्थांसाठी मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय वाढवण्यासाठी एक प्रमुख संसाधन म्हणून काम केले आहे. ते मुंबई विद्यापीठाच्या एन.एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून वाणिज्य चे स्नातक आहेत.

wpChatIcon