आमचे मार्गदर्शक

तमाल बंदोपाध्याय

तमाल हे एक अग्रगण्य व्यावसायिक पत्रकार आहेत, जे मिंट वृत्तपत्रात प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या साप्ताहिक स्तंभ–बँकिंग अँड फायनान्स बँकर्स ट्रस्ट’ साठी ओळखले जातात. एक दशकापूर्वी एचटी मीडियाने मिंट लाँच केल्यापासून ते कोर टीमचे सदस्य आहेत आणि सध्या हे बिझनेस स्टँडर्ड मध्ये तज्ञ स्तंभलेखक म्हणून देखील काम करतात. ते जन स्मॉल फायनान्स बँकेचे सल्लागार पण आहेत. ‘अ बँक फॉर द बक’, ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी’, ‘बंधन: द मेकिंग ऑफ अ बँक’, ‘एचडीएफसी बँक 2.0 फ्रॉम डॉन टू डिजिटल’ ‘पँडेमोनियम: द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रॅजेडी’ आणि सर्वात अलीकडील “रोलर कोस्टर: एन अफेयर विथ बँकिंग” यांच्या समवेत वित्तविषयक काही सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांचे ते लेखक आहेत.

राधाकृष्णन नायर

बँकिंग, सिक्युरिटीज आणि विमा क्षेत्रातील चार दशकांहून अधिक अनुभव असून, ह्यांनी IRDA, SEBI आणि ICICI समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये बोर्ड-स्तरीय पदांवर काम केले आहे. विमा आणि सिक्युरिटीज क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ह्यांना ओळखलं जातं.

Ashok Barat

अशोक बराट

भारताचे चार्टर्ड अकाउंटंट्स आणि कंपनी सेक्रेटरीजचे फेलो सदस्य असून ह्यांनी युनिलिव्हर, इलेक्ट्रोलक्स, पेप्सी, टेलस्ट्रा आणि हेन्झ या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. फोर्ब्स अँड कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ म्हणून ते सेवानिवृत्त झाले आणि बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे पूर्वकालीन अध्यक्ष, ASSOCHAM चे MC सदस्य आणि IIM (L) चे पूर्वकालीन व्हिजिटिंग फॅकल्टी होते.

wpChatIcon