आमचे सल्लागार मंडळ


किशोरी जे. उदेशी

सौ. किशोरी जे उदेशी यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रातून एमए पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय बँकेत प्रदीर्घ काळ सेवा केली. त्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गर्व्हर्नर म्हणून नेमणूक झालेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. रिझर्व बँक ऑफ इंडियातर्फे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून ज्यांची नियुक्ती अशा त्या पहिल्या अधिकारी होत्या. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गर्व्हर्नर या नात्याने बँकिंग आणि नॉन बँकिंग क्षेत्रात नियमन आणि देखरेख करण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली. बँकांवर देखरेख करण्यासाठी स्विझर्लंड येथील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटसने स्थापन केलेल्या बसले कमिटी कोअर प्रिन्सिपल्स लायझन ग्रुप आणि कोअर प्रिन्सिपल वर्किंग ग्रुप ऑन कॅपिटल येथे त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधित्व केले. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गर्व्हर्नर म्हणून काम करताना त्यांनी सेबी, नाबार्ड आणि एक्झिम बँक यांच्या संचालक मंडळांवर तसेच भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रण (प्रा.) ली, बंगलोरच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले. त्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या अध्यक्षा देखील होत्या. सन २००६मध्ये बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड्स बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा म्हणून रिझर्व बँकेने त्यांची नियुक्ती केली. या पदावर त्या डिसेंबर २०११ पर्यंत कार्यरत होत्या. न्या. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील फायनान्शियल सेक्टर लेजिस्लेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनच्या सदस्य म्हणून भारत सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. महाराष्ट्र शासनाने त्यांची रेड क्रॉस सोसायटी, मुंबईच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली होती. अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली आहे.

जे सागर असोशिएटसचे माजी वरिष्ठ भागीदार राहिलेले श्री देसाई नामवंत वकील आहेत. सन १९८० पासून वकिलीव्यवसायात असलेले श्री देसाई कॉर्पोरेट लॉ आणि मर्कंटाईल लॉ या क्षेत्रातील तज्ञ आहेत. १९९७ ते २००३ या काळात ते उदवाडिया, उदेशी अँड बर्जीसचे व्यवस्थापकीय भागीदार होते. ते इंडियन काउन्सिल ऑफ आर्बिट्रेशन आणि लंडन कोर्ट ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेशनच्या पॅनल ऑफ आर्बिट्रेटर्सचे सदस्य आहेत. त्यांनी पत्रकार म्हणून एका नामवंत भारतीय दैनिकात काम केलेले आहे. ते अमेरिकन आर्बिट्रेशन असोसिएशनचे सहयोगी सदस्य आणि आयसीसी, इंडिया आणि द बॉंबे इन्कॉर्पोरेटेड लॉ सोसायटीचे सदस्य आहेत. सध्या ते अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेन्डन्ट बोर्ड मेंबर म्हणून कार्यरत आहेत.


बर्जिस देसाई

वित्तीय सेवा क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव असलेले रवीकुमार व्यावसायिक बँकर असून वास्तू हाऊसिंग फायनान्समध्ये ते नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. आयसीआयसीआय बँकेची उभारणी करण्यात आणि तिची वाढ करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते नॅशनल कमॉडिटीज अँड डेरिव्हेटीव्हज एक्स्चेंज ली चे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. हे एक्स्चेंज उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. कॉमर्स पदवीधर असलेले रवीकुमार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स आणि चार्टर्ड इन्स्टिटयूट ऑफ बँकर्स, लंडनचे असोसिएट आहेत. ते सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट इन्स्टिटयूट, लंडनचे फेलो देखील आहेत.


पी एच रविकुमार


बॉबी पारीख

मुंबई विद्यापीठाचे कॉमर्स पदवीधर असलेले बॉबी पारीख चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. ते बॉबी पारीख असोसिएट्स या कर आणि नियमन सल्ला पुरवणाऱ्या फर्मचे संस्थापक आहेत. ते प्रामुख्याने व्यवहार आणि अन्य व्यावसायिक पुनर्रचनांच्या संदर्भात कर आणि नियमन सल्ला क्षेत्रात कार्यरत आहेत. ते खासगी इक्विटी फंड्स, इतर गुंतवणूक संस्था आणि व्यवसायांचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याबरोबर या संदर्भात काम करतात. ते नियामक आणि धोरण निश्चित करणाऱ्या लोकांना नवीन नियम आणि धोरणे तसेच त्यांचे संभाव्य परिणाम या संदर्भात सल्ला देतात. बॉबी पारीख हे बीएमआर अ‍ॅडव्हायझर्स या कर आणि व्यावसायिक व्यवहार क्षेत्रातील नामवंत फर्मचे सहसंस्थापक होते आणि त्यांनी ती फर्म बारा वर्षांहून अधिक काळ चालवली. अर्नेस्ट अँड यंगचे भारतातील माजी सीईओ आणि ऑर्थर अँडरसनचे माजी राष्ट्रीय व्यवस्थापकीय भागीदार असलेले बॉबी पारीख अनेक व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांचे सदस्य आहेत. ते अशासकीय, ना नफा तत्त्वावरील तसेच खासगी संस्था आणि भारतीय कंपन्यांच्या सल्लागार आणि कार्यकारी मंडळांचे सदस्य देखील आहेत.

ओल्ड ब्रिगेड कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी राहिलेल्या केनेथ यांच्या गाठीशी २६ वर्षांहून अधिक काळ भारतातील कॅपिटल मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट रिसर्च क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यापूर्वी ते आयडीएफसी असेट्स मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूक अधिकारी होते. तेथे ते ९ बिलियन डॉलर्स एवढ्या निधीचे व्यवस्थापन करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयडीएफसी एमएफची भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारा म्युच्युअल फंड अशी ख्याती झाली. आयडीएफसीमध्ये रुजू होण्याआधी ते कोटक महिंद्रा असेट्स मॅनेजमेंटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून कार्यरत होते. आयडीएफसी आणि कोटक महिंद्राच्या असेट्स मॅनेजमेंट व्यवसायाच्या वृद्धीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते मुंबई विद्यापीठाच्या कक्षेतील एन एम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे कॉमर्स पदवीधर आहेत.


केनेथ एंड्रैड

आमचे मार्गदर्शक

तमल बंदोपाध्याय

तमाल बंदोपाध्याय हे नामवंत पत्रकार असून व्यावसायिक क्षेत्रातील घडामोडींवर MINT या वृत्तपत्रामधे ते लिहीत असलेले ‘बँकिंग अँड फायनान्स बँकर्स ट्रस्ट’ हे सदर नावाजले जाते. सुमारे एक दशकापूर्वी एचटी मीडियाच्या वतीने MINT वृत्तपत्र सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि सध्या ते बिझनेस स्टॅंडर्ड वृत्तपत्राचे नामवंत सदरलेखक आहेत. हे बंधन बँक ली चे सल्लागार असून त्यांनी वित्त विषयक ‘अ बँक फॉर द बक’, ‘सहारा: द अनटोल्ड स्टोरी, आणि ‘बंधन: द मेकिंग ऑफ या बॅंक’ एचडीएफसी बँक 2.0 पासून पहाट डिजिटल करण्यासाठी, पांडेमोनियम : द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रॅजेडी ही लोकप्रिय पुस्तके लिहिलेली आहेत.

राधाकृष्ण नायर

बँकिंग, सिक्युरिटीज आणि विमा क्षेत्रात काम करण्याचा चार दशकांहून अधिक अनुभव असलेल्या राधाकृष्ण नायर यांनी आय.आर.डी.ए, सेबी आणि आयसीआयसीआय ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या संचालक मंडळांवर काम केले आहे. विमा आणि सिक्युरिटीज क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यासाठी ते ख्यातकीर्त आहेत.

अशोक बराट

चार्टर्ड अकाउंटंटस अँड कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे फेलो मेंबर असलेले अशोक बारात यांनी भारतात आणि भारताबाहेर युनिलिव्हर, इलेक्ट्रोलक्स, पेप्सी, Telstra आणि Hainz अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. फोर्ब्स अँड कंपनी ली मधून ते व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ या पदावरून निवृत्त झाले. ते बॉंबे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे माजी अध्यक्ष आहेत. हे असोचॅम (ASSOCHAM) च्या व्यवस्थापकीय मंडळाचे माजी सदस्य आणि आयआयएम (एल) चे माजी व्हिजिटिंग फॅकल्टी देखील आहेत.

आमची टीम

रजत
संस्थापक

रजत हे इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. चे संस्थापक संचालक असून त्यांच्या पत्नी देवजानी या सहसंस्थापक आहेत.
रजत हे विधी पदवीधारक असून इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स अँड कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे फेलो आहेत.

त्यांनी त्यांची कारकीर्द रिझर्व बँक ऑफ इंडियामधून सुरु केली. सूत, औषधी, क्रेडिट रेटिंग, शिपिंग, लॉजिस्टिक्स, हायड्रोकार्बन आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग या क्षेत्रांमध्ये वित्तीय, सचिव आणि विधी विषयांशी संबंधित काम करण्याचा तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

रजत यांना PIPE, IPO, Rights and Preferential allotments या मार्फत समभाग वाटप करणाऱ्या कंपन्यांचे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स, प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स, आणि रिटेल व इन्स्टिट्यूशनल पब्लिक मार्केट इन्व्हेस्टर्स यांच्याबरोबर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. क्रिसिलमध्ये मानांकनाच्या कालावधीत काम करताना त्यांना वेगवेगळ्या भांडवल सुविधाचा परिचय करून घेता आला. जिने क्रिसिलचा बाजरपेठेशी परिचय करुन दिला त्या IPO बाजारपेठेत प्रवेश करणार्‍या टोरेंट ग्रुपच्या पहिल्या कंपनीत त्यांनी काम केले आहे. त्यांना डीमर्जर प्रक्रियेवर काम करण्याच्या दांडगा अनुभव आहे. त्यांनी व्यावसायिकरित्या व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या मोठ्या संस्थांच्या मालकीच्या तसेच कुटुंबांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.

कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्युज च्या कालावधीपासून सेबीद्वारा नियंत्रित मुक्त बाजारपेठेपासून वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये रजत यांनी काम केलेले आहे आणि त्यांना व्यावहारिक अडचणी सोडवण्याचे ज्ञान आहे. त्यांच्या पब्लिक ऑफरिंग्स, राईट्स इश्यूअन्स आणि डीमर्जर या क्षेत्रातील अनुभवामुळे कंपनीला मोलाची मदत होते.

इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. पुरवत असलेल्या सेवांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांशी तसेच इतर सहभागी व्यक्तींशी सातत्याने संपर्क साधून काम करणे तसेच निश्चित संकल्पनांच्या आधारे संवाद साधून सुयोग्य प्रतिनिधित्व करण्याचा समावेश आहे.

त्यासाठी रजत आणि देवजानी यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव असलेल्या तरुण व्यक्तींची टीम उभारून इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. तिच्या ग्राहकांनी उत्तम दर्जाची सेवा देते.
या टीममध्ये बँकिंग, वित्त, सेक्रेटरीयल, विधी, गुंतवणूक आणि शेअर नोंदणी या क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी आणि स्वयंप्रेरित तरुण व्यावसायिकांचा समावेश आहे.

शोभना एक आर्थिक व्यवसायी आहेत व त्यांनी भारत आणि परदेशातील वित्तीय संस्थांमध्ये काम केले आहे.

त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतात स्थापन केलेल्या पहिल्या व्हेंचर फंडात (जागतिक बँकेने सहप्रायोजित केलेल्या) संस्थापक संघाचे सदस्य म्हणून केली होती. कोअर टीमचा भाग असल्याने, त्यांना सिस्टम सेटअप, प्रकल्प मूल्यांकन, भांडवल रचना, योग्य परिश्रम, वितरण आणि देखरेख इत्यादी रितींची ओळख झाली.

आयसीआयसीआय बँकेच्या ग्रुप क्रेडिट रिस्क टीममधील त्यांच्या भूमिकेमुळे जोखीम मूल्यांकन आणि देखरेखीसाठी त्यांचा अंतर्गत दृष्टीकोन अत्यंत चांगला झाला. त्यानंतर त्या दुबईला गेल्या जिथे त्यांनी प्रथम अधिकोष फायनान्स कंपनीमध्ये काम केले, जिथे त्यांनी मशरीक बँकेत अधिकोष डेस्क प्रकल्प उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतर शेख मोहम्मद बिन रशीद फाऊंडेशन (दुबई सरकारचे एक युनिट) येथे सल्लागार-तज्ञ म्हणून काम केले.

एका बहुराष्ट्रीय बँकेत वरिष्ठ खाजगी कर्ज तज्ञ म्हणून काम केल्यावर क्रेडिट व्यवसायाच्या वाढीस पाठिंबा देत त्यांनी संपत्ती व्यवस्थापन सेवांचा रसास्वाद अनुभवला.

शोभना सी.एफ.ए. (भारत), एमबीए (वित्त) पात्रता धारक आहेत.

Shobhana

शोभना राजगोपालन अय्यर
मुख्य इंटरफेस अधिकारी

संदीप वडनेरे

संदीप वडनेरे हे इंजिनियरिंग, सेवा व्यवस्थापन, विक्री क्षेत्रात काम करण्याचा १४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले प्रॉडक्ट स्ट्रॅटेजीस्ट आहेत.
ते हेड होंचोमध्ये महत्वाच्या पदावर होते. तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनियरिंग आणि प्रॉडक्ट क्षेत्रात संकल्पना निर्मितीपासून ते यशस्वी व्यवसायाची उभारणी करण्याचे काम करणाऱ्या टीम उभारण्यात आल्या. प्रॉडक्ट निर्मितीचे वेगवेगळे टप्पे आणि तांत्रिक उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.

हेड होंचोमध्ये रुजू होण्यापूर्वी ते कॅस्पर कन्सल्टिंग या गुरगावमधील फर्मचे संस्थापक होते. त्यांनी दिल्लीमध्ये ब्लॅंकेट वाटपासाठी ‘लीप ऑफ फेथ’ कार्यक्रम देखील सुरु केला. वडनेरे यांनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज ली मध्येही काम केलेले आहे. त्यांनी मुंबई येथील व्हेसिट मधून कॉम्प्युटर सायन्समधील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असून जमशेदपूर येथील एक्सएलआरआय स्कुल ऑफ बिझनेस अँड ह्युमन रिसोर्सेसमधून व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.