वारसा हक्काच्या हस्तांतरणासाठी पूर्वतयारी

दैनंदिन कामात व्यस्त असताना आपण आपल्या पूर्वी करून ठेवलेल्या गुंतवणुकांकडे (असेट प्रोफाईल) क्वचितच लक्ष देतो. बदलत्या परिस्थितीनुरूप त्यांच्यात आवश्यक ते बदल करणे, वेगवेगळ्या बाबींची पूर्तता करणे इत्यादी आवश्यक गोष्टी वेळच्यावेळी करण्याचा आपल्याला विसर पडतो. गुंतवणुकीची मालकी (ताबा), गुंतवणुकीचे स्वरूप, गुंतवणुकीचे व्यवस्थापन इत्यादीबाबत आपण केलेली व्यवस्था बदलत्या कालानुरूप किंवा नातेसंबंधांच्या बदलत्या स्वरूपामुळे उपयुक्त राहत नाही. आणि तिच्यात बदल करणे राहून जाते. इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. स्थावर आणि जंगम, वित्तीय आणि वित्तीय नसलेल्या अशा विविध प्रकारच्या मालमत्तांची मालकी आणि ताबा या संदर्भात माहिती आणि विदा गोळा करून आणि त्या माहिती आणि विदाचे विश्लेषण करून, तसेच कागदपत्रांची छाननी करून तपासणी करते. त्यामुळे मृत्यूसारखी दुर्दैवी घटना घडल्यास हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत येऊ शकणारे धोके आणि अडथळे याचे मूल्यमापन करणे शक्य होते. प्रत्येक मालमत्तेची अस्तित्वात असलेली कागदपत्रे आणि प्रशासन व्यवस्था यासारख्या बाबींची मृत्यूसारखी परिस्थिती उद्भवल्यास हस्तांतरणाच्या संदर्भात सक्षमता कितपत असेल याची तपासणी इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. करते. हे करत असताना मृत्युपत्र केलेले असल्यास त्यातील तरतुदीदेखील विचारात घेतल्या जातात. मालमत्तांचे हे मूल्यांकन केल्यामुळे मालमत्ता दर्जा अहवाल किंवा मालमत्तांच्या आरोग्याबाबतचा अहवाल (Asset Status Report - Health Card) बनवणे शक्य होते. मालमत्तांच्या दस्तऐवजांच्या आधारे धोक्याची पातळी ठरवून वारसा हस्तांतरित करण्याच्या तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. वारसा हक्काच्या हस्तांतरणासाठी पूर्वतयारीची सेवा (Preparedness for Inheritance Complaint - PIC) ही सेवा पुरवते.

भविष्य – तारतम्य

अशाप्रकारे वारसा हक्काच्या हस्तांतरणासाठी पूर्वतयारीची सेवा (Preparedness for Inheritance Complaint – PIC) या सेवेमुळे आमचे पक्षकार पूर्ण माहिती मिळवून निर्णय घेऊन आणि त्रुटी आढळून आल्यास त्या दूर करून त्यांचा वारसा निर्वेध करण्यासाठी सक्षम होतात.  मृत्यूसारखी अटळ घटना घडल्यास तिला तोंड देण्यासाठी माहिती मिळवून तयार असलेल्या समाजाची निर्मिती करणे हा इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. कंपनीचा उद्देश आहे. अशी दुर्दैवी घटना घडल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला सहानुभूतीपूर्वक हाताळणे आणि वास्तवाचे भान राखून शोकातून बाहेर पडण्यासाठी  आपल्याला सज्ज ठेवणे हा या सेवेमागील उद्देश आहे.

वारशाच्या अधिकारासाठीच्या गरजा

इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. तिच्या वारशाच्या अधिकारासाठीच्या गरजा (Inheritance Needs/ I - NEED) सेवेमार्फत मृत पक्षकाराच्या शोकाकुल परिवारास भरभक्कम आधार पुरवते.

मृत व्यक्तीच्या मालकीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचे कायदेशीर वारस आणि लाभार्थींना हस्तांतरण करण्याच्या संदर्भात आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून शोकाकुल परिवाराला मदत करणे हा या सेवेचा उद्देश आहे. यासाठी खाजगी आणि  निमसरकारी क्षेत्रातील व्यक्ती आणि कंपन्या, सरकारी खात्यांची कार्यालये अशा सर्व संबंधितांशी इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. संपर्क साधून चर्चा करते  आणि त्याद्वारे वेळेत आणि कायदेशीर पद्धतीने निर्वेध हस्तांतरण घडवून आणणे साध्य करते. यासाठी इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. कंपनीकडे कायदा आणि कर या विषयांमधील तज्ञ आणि व्यावसायिक व्यक्तींचे सल्लागार मंडळ उपलब्ध आहे. या सल्लागार मंडळाचे सभासद शोकाकुल परिवाराला सर्वतोपरी सहाय्य पुरवण्यास सज्ज असतात.