मृत्यू जेव्हा आपल्या एखाद्या जिवलगाचा घास घेण्यासाठी घोटाळत असतो तेव्हा आपल्याला त्याचा पुर्वाभास होतो. म्रूत्यू पुर्वसुचना देऊन येत नाही, पण एखाद्या जीवनाचा अंत तो करतो तेव्हा उध्वस्त कुटुंब, साहचर्याच्या वैफल्याची भावना आणि अगतिक सहचार्याला मागे सोडतो. कुटुंबातील एखाद्या जिवाभावाच्या माणसाला, एखाद्या जिवलगाला, एखाद्या वरिष्ठ गुरुवत व्यक्तीला किंवा व्यावसायिक संबंधिताला गमावण्याच्या शोक आणि दु:खाची अनुभुती प्रत्येकाला कधीतरी येतेच. अशा दु:खद प्रसंगी आपल्या शोकमग्न मनात अगतिकता ओतप्रोत भरुन राहिलेली आपल्याला जाणवते.
एखाद्या निकटवर्तीय नातेवाईक, परिचित, मित्र, सहकारी किंवा ओळखीच्या व्यक्तीला गमावल्यानंतरच्या त्या शोकमग्न वातावरणात आपल्याभोवतीचे सारे जग, त्याच्या जगरहाटी बंद पडल्यासारखे आपल्याला वाटते. अशावेळी आपण साहचर्य आणि बांधीलकीची भावना दर्शवणार्या जुन्या आठवणी काढत राहतो आणि त्यामुळे आपल्याला ग्रासणारी वैफल्याची भावना अधिकाधिक तीव्र होत राहते. विशेषतः मृत व्यक्ती कुटुंबातील मुख्य कमावती व्यक्ती असल्यास तर शोकमग्न कुटुंबावर भावनिक धक्क्याशिवाय आर्थिक असुरक्षिततेचाही मोठा आघात होतो. अशा वेळी कुटुंबातील सदस्य गोंधळलेल्या मनस्थितीत असतात आणि निर्णय घेताना अनेकदा विवेक पाळला जात नाही. अशा वेळी सुयोग्य मार्गदर्शन आणि सहाय्याची अत्याधिक आवश्यकता असते.