गरजेची उत्पत्ती

इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. कंपनी आता वारशाच्या अधिकारासंदर्भात एक अनोखी सेवा भारतात पुरवणे सुरु करत आहे.

आपल्या आयुष्यातील ध्येये आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांची कारकीर्द, व्यवसाय, उद्योग इत्यादीसाठी अविरत प्रयत्न करत असतात. त्यापुढे जाऊन कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू, अपघात किंवा अंशतः किंवा संपूर्ण विकलांगता यासारखी एखादी दुर्घटना अचानक घडल्यास कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे असाही त्यांचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक करून ते कुटुंबाच्या भविष्यकालीन गरज आणि अचानक उद्भवणारे खर्च यासाठी तरतूद करून ठेवतात. दैनंदिन कौटुंबिक गरजांसाठी आणि निवृत्तीनंतर ते जेव्हा कमावत असणार नसतील तेव्हा वयोमानपरत्वे वाढणाऱ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च किंवा इतर अचानक उद्भवणाऱ्या गरजांसाठी तरतूद करून ठेवणे असा या गुंतवणुकीचा प्राथमिक उद्देश असतो. त्याखेरीज आपल्यामागे आपली उरलेली बचत आणि संपत्ती आपल्या मर्जीनुसार पुढील पिढीला मिळावी अशीही त्यांची इच्छा असते.

मृत्यूपश्चात मालमत्तेचे निर्वेध हस्तांतरण करण्यात सहाय्य पुरवणे हा इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. ली. पुरवत असलेल्या सेवांचा उद्देश आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा तिच्या मालमत्तेचे निर्वेध हस्तांतरण करणे शक्य व्हावे हा विचार करून या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

Why services provided by Inheritance Needs relevant?

Parents and elder members of the family work tirelessly pursuing their respective careers, profession, business, vocation etc. to meet their objectives in life and to achieve their goals. Further, they aim to make provision for the financial security for the family in case of sudden uneventful happenings of the bread earners like accident or partial or full disability.. They save adequately by creating a corpus of investments to take care of the family’s future needs and also for unforeseen expenses. The corpus is primarily aimed to meet the day to day household needs in terms of funding expenses and when they would no longer be earning (post retirement) , to meet medical expenses and contingencies, which would be high due to age related ailments. Lastly, post their demise, they wish to pass on their residual wealth and their savings to the next generation as per their wish and choice. Inheritance Needs Services Pvt. Ltd. through its services aims to provide seamless transfer of the assets in case of bereavement. The idea of formulating the services is to enable smooth transition of assets, when the loved ones are no more.