April 15, 2020

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक – हस्तांतरणाची प्रक्रिया आणि पद्धत

by inheritance in marathi

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक – हस्तांतरणाची प्रक्रिया आणि पद्धत

मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतरची म्युच्युअल फंड गुंतवणूक हस्तांतरणाची प्रक्रिया आणि पद्धत

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

जेव्हा एखादा व्यक्तींचा समूह किंवा अनेक संभाव्य गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याच्या समान उद्देशाने एकत्र येऊन गुंतवणूक करण्यासाठी निधी जमा करतात तेव्हा अशा प्रकारे जमा केलेल्या निधीला म्युच्युअल फंड असे म्हणतात.

अशा प्रकारे समविचारी संभाव्य गुंतवणूकदारांकडून निधी जमा करणाऱ्या निकायास (संस्थेस) ट्रस्ट असे म्हणतात. अशा संस्थेचे व्यवस्थापन व्यावसायिक टीमच्या मार्फत केले जाती आणि गुंतवणूक कोठे, कशी आणि किती करायचे यासंदर्भातील निर्णय फंड मॅनेजर घेतात. अशाप्रकारे फंड मॅनेजर आणि त्याची/ तिची टीम विशिष्ठ कंपन्या किंवा उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याचे निर्णय गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध निधीचे स्वरूप समभाग, बंधपत्र, मनी मार्केटमधील पर्याय आणि/ किंवा रोखे यापैकी कोणत्या प्रकारचे आहे हे विचारात घेऊन घेतात.

प्रत्येक गुंतवणूकदारास फंडमधील त्याच्या गुंतवणुकीच्या (होल्डिंग) प्रमाणात युनिटसची मालकी मिळते.

गुंतवणूकदारास म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करता येते?

म्युच्युअल फंड युनिटस खरेदी करण्यासाठी किंवा त्यांच्यात सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारास अर्ज भरून सर्व नो युवर कस्टमर (केवायसी) कागदपत्रांसह सादर करावा लागतो.एक व्यक्ती किंवा संयुक्त (जास्तीतजास्त तीन अर्जदार) किंवा मागे राहील तो (आयदर ऑर सर्व्हायव्हर) किंवा एकत्र या स्वरूपाची  म्युच्युअल फंड युनिटस घेता येतात. हिंदू अविभक्त कुटुंबाचा (एचयुएफ) कर्ता म्हणून देखील घेता येतात. म्युच्युअल फंड युनिटससाठी नामांकन सुविधा देखील उपलब्ध असते.

म्युच्युअल फंड कागदपत्रांच्या स्वरूपात किंवा निक्षेपस्थानामार्फत (डिपॉझीटरीमार्फत) घेता येतात. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास संबंधित म्युच्युअल फंडला स्वतंत्रपणे त्याबाबत आणि निक्षेपस्थानाबाबत  (डिपॉझीटरीबाबत) माहिती पुरवावी लागते.

म्युच्युअल फंडच्या संदर्भात नामांकन

नामांकन केलेली व्यक्ती केवळ म्युच्युअल फंड बंद केल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पन्न म्युच्युअल फंडमध्ये सहभागी व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना सोपवणारी विश्वस्त (ट्रस्टी) असते.

कोणताही अर्जदार, मग तो एकल धारक, संयुक्त धारक, हिंदू अविभक्त कुटुंबाचा (एचयुएफ) कर्ता अशा कोणत्याही प्रकारे सहभागी असो, युनिट खरेदीसाठी अर्ज करताना नामांकनासाठी नोंदणी करू शकतो. नामित व्यक्ती अजाण बालक असल्यास नामांकनासाठी अजाण पालकाचे नाव म्युच्युअल फंडबरोबर नोंदवणे आवश्यक असते. एखाद्या खात्यासाठी अनेक जणांचे नामांकन देखील करणे शक्य असते. गुंतवणूकदार प्रत्येक खात्यासाठी जास्तीतजास्त तीन जणांना त्यांच्यापैकी प्रत्येकाला किती टक्के युनिटसचे वाटप करावे या निर्देशांसह नामांकित करू शकतो. नामांकनाची नोंदणी नवीन युनिट खरेदी करताना करता येते. म्युच्युअल फंडकडे निर्धारित नमुन्यातील अर्ज करून नामांकन केव्हाही बदलता आणि/ किंवा रद्द करता येते.

म्युच्युअल फंड गुंतवणूकदार त्याच्या सध्याच्या स्वतंत्र गुंतवणुकीसाठी संयुक्त धारक जोडू शकतो काय?

नाही. असे करणे शक्य नाही. स्वतंत्र धारकाच्या खात्याच्या संदर्भात जोडधारकाचे नाव जोडणे आणि जीवित संयुक्त खात्याच्या संदर्भात एखाद्या धारकाचे नाव वगळणे या प्रकारचे धारकत्वातील (होल्डिंग) बदल फंड मान्य करत नाहीत.

परंतु, संयुक्त खात्याच्या धारकांपैकी एखाद्या धारकाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीचे नाव वगळले जाईल आणि ते एकाच धारकाचे स्वतंत्र खाते होईल. परंतु, यासाठी आवश्यक ते अर्ज भरावे लागतील.

संयुक्त खात्याचे स्वरूप कोणताही एक (आयदर ऑर) किंवा उर्वरित (सर्व्हायवर) बदलणे शक्य आहे?

होय, ही धारकांनी स्वतः:च करायची प्रशासकीय कार्यवाही असल्याने सर्व संबंधित धारकांच्या संमतीने असे बदल करता येतील. संयुक्त धारकांच्या मालकीच्या युनिटच्या संदर्भात खात्याचे संयुक्त स्वरूप बदलून कोणताही एक (आयदर ऑर) किंवा उर्वरित (सर्व्हायवर) असे करणे शक्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यक ते अर्ज भरण्याची गरज असते.

एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नामित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे ज्यामुळे समाधान होईल असा कागदोपत्री पुरावा सादर करून कोणत्याही वेळी मृत खातेधारकाच्या गुंतवणुकीचे विमोचन करू शकेल.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (इएलएसएस) च्या संदर्भात खातेधारकाचा मृत्यू झाल्यास नामित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस  मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे ज्यामुळे समाधान होईल असा कागदोपत्री पुरावा सादर करून मृत खातेधारकाच्या गुंतवणुकीचे विमोचन करू शकेल. गुंतवणुकीचा लॉक इन पिरियड तीन वर्षांचा असला तरी हे मृत खातेधारकास युनिटचे वाटप झाल्यापासून किमान एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर किंवा त्यानंतर केव्हाही असे करता येईल. गुंतवणुकीच्या लॉक इन पिरियडच्या संदर्भातील इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (इएलएसएस) नियमावलीत बदल करून गुंतवणुकीचा लॉक इन पिरियड कालावधी वेळोवेळी बदलण्याचे हक्क ट्रस्टने राखून ठेवलेले असतात.

मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या युनिटचे हस्तांतरण करण्यासाठी सर्वसाधारणपणे एकसारखी पद्धत वापरतात पण वेगवेगळ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या वेगवेगळ्या नमुन्यातील अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रे मागू शकतात.

हस्तांतरणाची मूलभूत प्रक्रिया

नामित व्यक्तीने किंवा कायदेशीर वारसाने मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे समाधान होईल अशी कागदपत्रे युनिटचे हस्तांतरण करण्याच्या विनंतीसह मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या ग्राहक संपर्क केंद्रात प्रत्यक्ष किंवा पोस्टद्वारे सादर करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीने अनेक म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक केलेली असल्यास प्रत्येक म्युच्युअल फंडशी स्वतंत्रपणे संपर्क साधने गरजेचे असते.

एकल खातेधारक मरण पावलेला असल्यास आणि नामांकन नोंदणी केलेली असल्यास

मृत गुंतवणूकदाराचे कुटुंबीय किंवा कायदेशीर वारस यांनी म्युच्युअल फंड हाऊसकडे पुढील करणे आवश्यक असते:

 • युनिटस आपल्या नावावर करावे अशी विनंती करणारी नामित व्यक्तींनी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी/ म्युच्युअल फंडला लिहिलेले पत्र
 • नमुन्यानुसार भरलेला अर्ज (आवश्यक असल्यास) मृत्यू प्रमाणपत्राच्या नोटराइझ केलेल्या प्रतीसह
 • नामित व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा (पासपोर्ट, शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना इ.) नमुन्यानुसार नव्या प्रथम युनिट धारकाच्या बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक
 • नामित व्यक्तीची नो युवर कस्टमर (केवायसी) कागदपत्रे आणि फॉरीन अकाऊंट कॉम्प्लायन्स अ‍ॅक्ट (फॅक्टा) नियमावलीनुसार केलेल्या घोषणापत्र. नो युवर कस्टमर (केवायसी) कागदपत्रांमध्ये मुलत: संबंधित व्यक्तीच्या ओळखीचे आणि पत्त्याचे पुरावे व छायाचित्र यांचा समावेश असतो तर  फॉरीन अकाऊंट कॉम्प्लायन्स अ‍ॅक्ट (फॅक्टा) नियमावलीनुसार केलेल्या घोषणापत्रात संबंधित व्यक्तीच्या मालकीची परदेशात मालमत्ता किंवा उत्पन्न आहे काय याबाबतच्या माहितीचा समावेश असतो.
 • अन्य दाव्यांच्या संदर्भात घोषणापत्र आणि विमोचनपत्र. प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचा विमोचनपत्राचा स्वतःचा नमुना असतो. बँकांना विमोचनपत्र स्टॅम्प पेपरवर केलेले असावे लागते. अशा स्टॅम्प पेपरचे मूल्य सहसा ज्या राज्यात नामित व्यक्ती राहते ते राज्य ठरवते.
 • त्याखेरीज मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने दिलेले खात्याचे सर्वात नवीन स्टेटमेंट देखील जोडावे.

एकल खातेधारक मरण पावलेला असल्यास आणि नामांकन नोंदणी केलेली नसल्यास

गुंतवणूकदाराचा मृत्यू झालेला असल्यास त्याने मृत्युपत्र केलेले असले किंवा नसले तरीदेखील त्याचे कुटुंबीय किंवा कायदेशीर वारस किंवा नामित व्यक्ती यांनी म्युच्युअल फंड हाऊसकडे पुढील करणे आवश्यक असते:

 • युनिटस आपल्या नावावर करावे अशी विनंती करणारी दावा करणाऱ्या व्यक्तींनी (खात्याच्या प्रस्तावित पहिल्या धारकाने) मालमत्ता व्यवस्थापन कंपनी/ म्युच्युअल फंडला लिहिलेले पत्र
 • मृत्यू प्रमाणपत्राची मूळ किंवा नोटराइझ केलेली प्रत
 • दावा करणाऱ्या व्यक्तींच्या (खात्याच्या प्रस्तावित पहिल्या धारकाच्या) बँक खात्याचे तपशील नमुन्याप्रमाणे
 • दावा करणाऱ्या व्यक्तीची नो युवर कस्टमर (केवायसी) तपशील – ओळखीचे पुरावे (पासपोर्ट, शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना इ)
 • अन्य दाव्यांच्या संदर्भात विमोचनपत्र
 • मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने दिलेले खात्याचे सर्वात नवीन स्टेटमेंट
 • मृत्युपत्र केलेले असल्यास आणि त्यात या श्रेणी किंवा स्वरूपाच्या गुंतवणुकीचा दुरान्वयानेही उल्लेख असल्यास मृत्युपत्राची प्रत, संबंधित रक्कम मोठी असल्यास मालमत्ता व्यवस्थापन कंपनी प्रोबेट केलेल्या मृत्युपत्राची प्रत मागू शकते.

परंतु आवश्यक असलेली कायदेशीर कागदपत्रे कोणती यात हस्तांतरित केल्या जात असलेल्या गुंतवणुकीच्या रकमेनुसार (थ्रेशोल्ड लिमिटनुसार) बदल होऊ शकतो .

थ्रेशोल्ड लिमिटच्या संदर्भात प्रत्येक फंडची स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे आहेत.

 

अनु. क्र.मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचे नावथ्रेशोल्ड लिमिट
अ‍ॅक्सिस असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
आदित्य बिर्ला सनलाईफ असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
बरोडा पायोनियर असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. १ लाख
बीएनबी परिबास असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
बीओआय एएक्सए इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. ली.रु. २ लाख
कॅनरा रोबेको असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
डीएचएफएल प्रमेरिका असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
डीएसपी  ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स प्रा. ली.रु. २ लाख
एड्ल्सवेस असेट्स मॅनेजमेंट ली.रु. २ लाख
१०एस्सेल फायनान्स एएमसी ली.रु. २ लाख
११फ्रॅंकलाईन टेम्पल्टन असेट्स मॅनेजमेंट ली.रु. २ लाख
१२एचडीएफसी असेट्स मॅनेजमेंट ली.रु. ५ लाख
१३एचएसबीसी असेट्स मॅनेजमेंट (इंडिया) प्रा ली.रु. २ लाख
१४आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. १० लाख
१५आयडीबीआय असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
१६आयडीएफसी असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
१७इंव्हेस्को असेट्स मॅनेजमेंट (इंडिया) कंपनी ली.रु. २लाख
१८इंडियाबुल्स असेट्स मॅनेजमेंट (इंडिया) कंपनी ली.रु. २ लाख
१९आयआयएफसीएल असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
२०जेएम फायनान्शियल असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
२१कोटक महिंद्रा असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
२२एल अँड टी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट ली.रु. २ लाख
२३एलआयसी म्युच्युअल फंड असेट्स मॅनेजमेंट ली.रु. २ लाख
२४मिराई असेट ग्लोबल इन्व्हेस्टमेंट (इंडिया) ली.रु. २ लाख
२५मोतीलाल ओसवाल असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. १ लाख
२६प्रिन्सिपल पीएनबी असेट मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
२७क्वांटम असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
२८एल अँड टी इव्हेस्टमेन्ट मॅनेजमेंट ली.रु. २ लाख
२९रिलायन्स निप्पोन लाईफ असेट मॅनेजमेंट ली.रु. २ लाख
३०एसबीआय फंड मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
३१सुंदरम असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. १ लाख
३२श्रीराम असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
३३टाटा असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
३४टौरस असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
३५युनियन असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. २ लाख
३६युटीआय असेट्स मॅनेजमेंट कंपनी ली.रु. ५ लाख

(स्रोत : संबंधित मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांच्या वेबसाईट आणि  जाहीरकेलेली माहिती )

जे हस्तांतरित करायचे आहेत अशा म्युच्युअल फंड युनिटसचे एकूण मूल्य थ्रेशोल्ड लिमिटहून कमी असल्यास दावा करणाऱ्या व्यक्ती/ व्यक्तींचे मृत युनिट धारकाशी असलेले नाते सिद्ध करणारा कोणताही योग्य दस्तऐवज.

हस्तांतरित  करण्याची रक्कम थ्रेशोल्ड लिमिटएवढी किंवा त्याहून अधिक असल्यास पुढील कागदपत्रे आवश्यक असतील:

 • प्रोबेट केलेल्या मृत्युपत्राची नोटराइझ केलेली प्रत
 • सक्षम न्यायालयाने जारी केलेले कायदेशीर वारस प्रमाणपत्र किंवा वारस प्रमाणपत्र किंवा दावेदारी प्रमाणपत्र, किंवा
 • मृत्युपत्राविना वारस असल्यास प्रशासनाचे पत्र
 • एकाहून अधिक दावेदार असल्यास त्यांच्यापैकी दावा करणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीस अन्य लाभार्थींकडून विना हरकत प्रमाणपत्र/ हक्कसोड मिळवून त्यासोबत मृत्युपत्राची प्रोबेट/  प्रशासनाचे पत्र सादर करावे लागेल
 • दावेदार अजाण बालक असल्यास जन्मतारखेच्या पुराव्याची साक्षांकन केलेली प्रत आणि नैसर्गिक पालकाच्या ओळखीचा पुरावा

संयुक्त, कोणीही किंवा उर्वरित अशा स्वरूपाच्या संयुक्त खात्याच्या सर्व धारकांचे मृत्यू झाल्यास एकल धारकाच्या संदर्भात लागू असलेली प्रक्रिया तशीच लागू होईल.

युनिटसचा प्रथम धारक मरण पावल्यास

युनिटसचा प्रथम धारक मरण पावल्यास युनिटस उर्वरित धारकांच्या नावावर हस्तांतरित केले जातील आणि उर्वरित धारकांना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील:

 • उर्वरित युनिट धारकाचे प्रथम धारकाचा मृत्यू झाल्याबाबत सूचना देणारे पत्र
 • मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत किंवा नोटराइझ केलेली प्रत
 • नवीन प्रथम धारकाच्या पत्ता, बँक खाते आणि पॅनचे तपशील
 • उर्वरित धारकांचे नो युवर कस्टमर तपशील, आधीच सादर केलेले नसल्यास

युनिटसच्या संयुक्त धारकांपैकी एका धारकाचा मृत्यू झाल्यास

युनिटसच्या संयुक्त धारकांपैकी प्रथम धारक वगळता एका धारकाचा मृत्यू झाल्यास युनिट प्रथम धारकाच्या नावावर राहतील. प्रथम धारकास संयुक्त धारक म्हणून अन्य कोण्या व्यक्तीला नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध राहील. त्यासाठी पुढील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे:

 • संयुक्त धारकाचा मृत्यू झाल्याची सूचना देणारे उर्वरित धारकांचे पत्र
 • संयुक्त धारकाच्या मृत्यू प्रमाणपत्राची नोटराइझ केलेली प्रत

हिंदू अविभक्त कुटुंबातील कर्त्याचा मृत्यू झाल्यास

अन्यथा विसर्जित केल्याखेरीज हिंदू अविभक्त कुटुंब ही शाश्वत संस्था असते. जरी कर्ता हिंदू अविभक्त कुटुंबाचे व्यवस्थापन करत असला तरी त्याच्या मृत्यूने ती संस्था संपुष्टात येत नाही. हिंदू अविभक्त कुटुंबाचे सदस्य नवीन कर्ता नेमू शकतात. युनिटसचे हस्तांतरण करण्यासाठी त्याला पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील:

 • निर्धारित नमुन्यातील कर्ता बदलण्याची विनंती करण्याचे नव्या कर्त्याने सही केलेले पत्र
 • मृत्यू प्रमाणपत्राची मूळ किंवा नोटराइझ केलेली प्रत
 • हिंदू अविभक्त कुटुंबाच्या बँक खात्यासाठी नव्या कर्त्यांची सही आणि तपशील प्राधिकृत केल्याचे बँकेचे प्रमाणपत्र
 • हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नव्या कर्त्याचे नो युवर कस्टमर (केवायसी) तपशील आणि पूर्वीच दिलेले नसल्यास हिंदू अविभक्त कुटुंबाचे नो युवर कस्टमर (केवायसी) तपशील
 • नव्या कर्त्याच्या ओळखीचा पुरावा
 • अन्य हिस्सेदारांच्या सहीचे विमोचनपत्र आणि नवीन कर्त्याने स्टॅम्प पेपरवर केलेले किंवा संबंधित राज्याने निर्धारित केलेल्या मुळ्याचे फ्रँकिंग केलेले विमोचनपत्र

कोणीच हिस्सेदार शिल्लक राहिलेला नसल्यास किंवा हस्तांतरित करण्याची रक्कम थ्रेशोल्ड लिमिटएवढी किंवा त्याहून अधिक नसल्यास हिंदू अविभक्त कुटुंबातील कोणत्याही जीवित सदस्याची हरकत असल्यास हस्तांतरण केवळ नेमणूकपत्राची (सेटलमेंट डीडची) नोटराइझ केलेली प्रत किंवा वाटणीपत्राची (डीड ऑफ पार्टीशनची) नोटराइझ केलेली प्रत किंवा संबंधित सक्षम कोर्टाने जारी केलेल्या डिक्रीच्या नोटराइझ प्रतीच्या आधारेच करण्यात येते.

 

हस्तांतरण दस्तऐवजांची सारणी – रेडी रेकनर
अनु. क्र.हस्तांतरणासाठी आवश्यक दस्तऐवजउर्वरित संयुक्त धारकांकडे हस्तांतरणएकल/ सर्व युनिट धारकांचा मृत्यू झालेला असल्यास आणि नामांकनाची नोंदणी केलेली असल्यासएकल/ सर्व युनिट धारकांचा मृत्यू झालेला असल्यास आणि नामांकनाची नोंदणी केलेली असल्यासहिंदू अविभक्त कुटुंबाच्या कर्त्याचा मृत्यू झालेला असल्यास
प्राथमिक कागदपत्रे
नामित केलेल्या व्यक्ती किंवा  दावेदार किंवा नवीन कर्त्याचे मालमत्ता व्यवस्थापन कंपनी/ फंड रजिस्ट्रारच्या नावे पत्र.
मृत युनिट धारक/ कर्त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत किंवा नोटराइझ केलेली प्रत किंवा  राजपत्रित अधिकारी/ बँक व्यवस्थापकाने साक्षांकित केलेली प्रत
नामित व्यक्ती किंवा दावेदार किंवा उर्वरित युनिट धारक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील सदस्य आणि नव्या कर्त्याचे किंवा अजाण बालक किंवा मानसिक अस्थिर दावेदाराच्या संदर्भात पालकाचे नो युवर कस्टमर (केवायसी) तपशील
बँक व्यवस्थापकाने साक्षांकित केलेले बँक खात्याचे तपशील किंवा खाते क्र. आणि धारकाचे नाव ज्याच्यावर लिहिले आहे अशा चेकची प्रत
अतिरिक्त कायदेशीर दस्तऐवज :

(विमोचनपत्र/ नोटराइझ केलेले स्टॅम्प पेपरवरील आणि नोटराइझ केलेले व्यक्तिगत प्रतिज्ञापत्र, नो युवर कस्टमर (केवायसी) तपशिलात  दिलेला पत्ता विमोचनपत्रातील पट्ट्याशी जुळणारा असावा).

१अ *सर्व कायदेशीर वारसांच्या सहीचे दावेदाराच्या दाव्यावर शिक्कामोर्तब करणारे विमोचनपत्र (जोडपत्र २)
१बकायदेशीर वारसाचे व्यक्तिगत प्रतिज्ञापत्र (जोडपत्र ३)
हस्तांतरण करण्याची रक्कम रु. २,००,०००/- याहून कमी असल्यास दावेदाराच्या युनिट धारकाशी नात्याचा पुरावा

हस्तांतरण करण्याची रक्कम रु. २,००,०००/- एवढी किंवा त्याहून अधिक असल्यास:

१. प्रोबेट केलेल्या मृत्युपत्राची प्रत किंवा

२. सक्षम न्यायालयाने जारी केलेले कायदेशीर वारस/ वारस/ दावेदारी प्रमाणपत्र किंवा

३. मृत्युपत्राविना मृत्यू झालेला असल्यास प्रशासनाचे पत्र

 

३असर्व हिस्सेदारांनी नव्या कर्त्यांची नियुक्ती करत सही केलेले विमोचनपत्र (जोडपत्र ४)
३बनियुक्तीपत्र (सेटलमेंट डीड) किंवा वाटणीपत्र किंवा संबंधित सक्षम कोर्टाने जारी केलेली डिक्री: (कोणताच हिस्सेदार जीवित नसल्यास आणि हस्तांतरित करायची रक्कम रु. २,००,०००/- याहून अधिक असल्यास किंवा हिंदू अविभक्त कुटुंबातील कोणत्याही जीवित सदस्यांची हरकत असल्यास)

(स्रोत: एएमएफआय  वेबसाईट आणि जाहीर केलेली माहिती )

वरीलपैकी मुद्दा क्र. २ (अतिरिक्त कायदेशीर दस्तऐवज) यात नमूद केलेल्यापैकी कोणताही दस्तऐवज दावेदाराने सादर केल्यास आणि हस्तांतरण करायची रक्कम रु. २ लाख किंवा त्याहून अधिक असल्यास मुद्दा क्र. १अ मध्ये नमूद केलेल्या विमोचनपत्राची आवश्यकता भासणार नाही.

  wpChatIcon